बिहारमध्ये पोलिसांवर गोळीबार करणार्‍या चौघांना अटक   

पाटणा : बिहारमधील पाटणा जिल्ह्यात वाहन तपासणी मोहिमेदरम्यान पोलिस कर्मचार्‍यांवर गोळीबार केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. शनिवारी रात्री बिहटा परिसरातील परेड ग्राऊंडजवळ ही घटना घडली. 
 
पोलिसांनी तपासणी मोहिमेदरम्यान भंगार साहित्य घेऊन जाणारे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चालकाने वाहन थांबवले नाही. पोलिसांच्या पथकाने या वाहनाचा पाठलाग केला आणि एका निवासी परिसरात ते वाहन ताब्यात घेतले. त्यावेळी बंदूकधार्‍यांनीही गोळीबार सुरू केला. पोलिसांनी गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त सुरक्षा कर्मचारीही तेथे पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. 

Related Articles